Democratic Awakening, Youth for Democracy and Healthy Society

जयहिंद स्टडी सर्कल (अभ्यास मंडळ)

जयहिंद स्टडी सर्कल (अभ्यास मंडळ)

हे प्रगल्भ कार्यकर्ता हा समाजकारणाचा व राजकारणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो किंबहुना कणाच असतो. कार्यकर्त्याचे किमान काही महत्त्वाच्या विषयावरील ज्ञान परिपूर्ण असले पाहिजे. सध्या सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला जातोय, खोटी माहिती प्रसृत केली जातेय पुरवली जातेय, राष्ट्रपुरुषांबद्दल अपप्रचार व समाजात द्वेष निर्माण केला जात आहे. याचा सामना करण्यासाठी संपूर्ण सत्य माहित असलेल्या व असत्याचा चेहरा उघडा करणारा कार्यकर्ता घडविणे ही काळाची गरज आहे. सध्या काही ठिकाणी भाडोत्री मनुष्यबळ वापरून व्यापारी पद्धतीने राजकारण करण्याचे नवीन तंत्र विकसित झालेले आहे. त्याचा पराभव करण्यासाठी कार्यकर्ते घडविण्याचे काम जयहिंद अभ्यास मंडळ करते. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र व राजकारण या विषयावर चर्चासत्रे आयोजित करून सदृढ समाजनिर्मितीसाठी प्रगल्भ, व्यासंगी कार्यकर्ता निर्माण केला जातो. कार्यकर्ता हा चळवळीचा आत्मा असल्याने निस्वार्थी, हुशार, लोकशाही मूल्यावर, राज्यघटनेवर व मानवतावादावर अचल श्रद्धा असणारा कार्यकर्ता घडवण्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्टडी सर्कल नेहमीच कार्यरत असते.

जर आपल्याला या जगात खरोखर शांती मिळवायची असेल तर मुलांना शिक्षण देण्यास सुरूवात करा - महात्मा गांधीं

स्टडी सर्कलचे विविध उपक्रम

  • अभ्यासमंडळ चालविणे
  • विविध विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले जाते.
  • महाविद्यालयीन स्तरावर वैचारिक व बौद्धिक गुणवत्ता वाढीवर भर दिला जातो.
  • तरुणांमध्ये महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
  • वाद-विवाद, वक्तृत्व, निबंध, कथाकथन इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते.
  • कायदा, संविधान तसेच इतर कायदेशीर विषयावर जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
  • स्पर्धा परीक्षा व युवकांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जाते.