Democratic Awakening, Youth for Democracy and Healthy Society

जयहिंद ही केवळ एक सेवाभावी संस्था नसून ही लोकचळवळ आहे.

आपली लोकशाही ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहे. ‘जयहिंद युवा चळवळ ‘ही अशीच एक चळवळ आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी वाहिलेली आहे.

आमच्या विषयी

महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली

महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली. छिन्न – विच्छिन्न अवस्थेत असलेल्या समाजाला एकसंघ राष्ट्रपण दिले. सत्य व अहिंसेचा एक नवा क्रांतिकारी मार्ग दाखविला. संपूर्ण जगभर परस्परांविषयी द्वेषाची भावना वाढत चाललेली आहे. किंबहुना काही शक्ती जाणीवपूर्वक धर्म, राष्ट्रवाद इत्यादी विषयांवर माणसा – माणसात फूट निर्माण करीत आहेत. संकुचित भावना, हिंसाचार, सत्तेचा गैरवापर, पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बेफिकिरी वाढत चाललेली आहे. समाजात भयावह तटस्थता आहे. अशा परिस्थितीत समाजातल्या सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन या समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध एकवटले पाहिजे. महात्माजींच्या शिकवणीनुसार सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपण हा लढा यशस्वी करूया. जयहिंदने गांधींजींच्या मार्गाने सुरु केलेल्या या चळवळीत आपण मनापासून सामील होऊ या आणि हा लढा यशस्वी करूया. जयहिंद याच ध्येयाने कार्य करत आहे.

आमचे कार्यरत प्रकल्प

महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जी जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली त्यांना जनमाणसांपर्यंत पोहचवणे

अध्यक्ष संदेश

डॉ. सुधीरजी तांबे अध्यक्ष जयहिंद लोकचळवळ

समाजातील सर्व नागरिक एकदिलाने एकात्म भावनेतून नांदतात, परस्परांवर विश्वास ठेवतात, त्यांचा परस्परांमध्ये सुसंवाद असतो, मतभेद निर्माण झाले तरी असे मतभेद चर्चेने व न्यायमार्गाने सोडविले जातात. असा समाज शांतताप्रिय व समजूतदार असतो. अशा समाजातील विविध जातीधर्माचे, पंथाचे, विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांचा आदर करतात, त्यांच्या चालीरीती, संस्कृतीविषयी जिव्हाळा – प्रेम बाळगतात, कोणाविषयीही द्वेष-मत्सर बाळगत नाहीत.

भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. संतांनी दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणारी आहे. सर्वसामान्य जनता धर्म, जात, पंथ वा भाषा याविषयी संकुचित विचारांचे नसतात. अन्यथा महाराष्ट्राचा शिवाजी गायकवाड तथा अभिनेता रजनीकांत तामिळ जनतेच्या हृदयावर राज्य करू शकला नसता. रजनीकांतसारखी असंख्य उदाहरणे आहेत.

जयहिंद लोकचळवळ

आपली लोकशाही ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहे. ‘जयहिंद युवा चळवळ ‘ही अशीच एक चळवळ आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी वाहिलेली आहे.

जयहिंद लोकचळवळ ही केवळ एक सेवाभावी संस्था नसून ही लोकचळवळ आहे. सुदृढ समाज निर्मितीच्या निर्धाराने सर्व वयोगटाच्या स्त्री-पुरुषांना संघटित करून, त्यांच्या सहाय्याने लोकांना बरोबर घेऊन हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सुदृढ निरोगी निकोप समाज हा राष्ट्राचा पाया असतो, हा पाया भक्कम असेल तरच राष्ट्र सामर्थ्यवान व प्रगत बनते. हा पाया कच्चा असेल तर राष्ट्र कमकुवत राहते.

People Directly
0 LK
People Indirectly
0 LK
States
0
Projects
0 +

मान्यवरांचे बोल

5/5

“जयहिंद लोकचळवळीचं काम तरुणांना एक नवीन दिशा देतंय, त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची शक्ती देतंय.”

मा.मंत्री, मा.प्र.अध्यक्ष महा. काँग्रेस
5/5

“पद, पैसा, बुद्धिमत्ता यांचे मूल्य नाही, तर आपण ज्या लोकांसोबत काम करतो त्यांची संख्याच मूल्यवान आहे. एकत्रितपणे काम केले तरच खेडेगाव संपन्न होईल.”

आदर्श सरपंच
5/5

“शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची काळजी घेण्यासाठी आणि त्याची सुपीकता वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.”

युवा उदयोजक

प्रभाव कथा

जयहिंद लोकचळवळ

महात्मा गांधींचे विचार

चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.  महात्मा गांधी

जयहिंद कशासाठी ?

एक सुदृढ़ समाज आपली न्यायप्रियता, समंजसपणा आणि सदसदविवेकबुद्धि जागृत ठेवतो

जयहिंद लोकचळवळ हे सुदृढ समाज निर्मितीचे लोकअभियान आहे. सुदृढ समाज हा प्रगत राष्ट्राचा पाया असतो. समाज सुदृढ असेल तरच ते राष्ट्र महान बनते, मात्र समाज सुदृढ नसेल तर देश कमकुवत व दुर्बल राहतो. अशा राष्ट्राला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इतरांच्या गुलामगिरीत राहावे लागते.