सांस्कृतिक मंच
जयहिंद सांस्कृतिक मंच
क्रीडाक्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सामाजिक प्रबोधन करण्याची प्रचंड क्षमता आहे. यामुळे समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मोठे यश प्राप्त होऊ शकते. गायन, नृत्य व नाट्य असे अत्यंत व्यापक स्वरूप सांस्कृतिक क्षेत्राला आहे.
जयहिंद लोकचळवळीमध्ये सांस्कृतिक विभागाला विशेष महत्त्व आहे. सध्या लोकजागर मंचाद्वारे सामाजिक जागृती करत आहे. समाजाचे जीवन सुसंस्कृत व समृद्ध करण्याचे काम हा विभाग करतो, त्यामुळे समाज अधिक आनंदी होतो.
- गावोगावी गीतमंच निर्माण करणे
- सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करणे.
- किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे.