जयहिंद कृषी
जयहिंद कृषी
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. त्यांच्या आत्महत्या ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असे सतत चाललेले दृष्टचक्र व काही चुकीची कृषिधोरणे, विशेषतः निर्यातीचे धोरण (भावाची कधीही शाश्वती नसणे) या अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी सतत अडचणीत असतो.
त्याचबरोबर घटती उत्पादकता व वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतीचे अर्थकारण सातत्याने बिघडत चाललेले आहे. तथापि कृषी क्षेत्रात काही ठोस उपाययोजना केल्यास शेती आपले बलस्थान होऊ शकते.
कृषी विभागामार्फत पुढील उपक्रम राबविले जातात
- माती परिक्षण विभाग.
- शेतकरी गट तयार करणे.
- तज्ञांचे मार्गदर्शन.
- सेंद्रिय शेतीला प्राधान्य.
- जैविक खत निर्मिती प्रकल्पाची उभारणी.
- दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसायास चालना.
- मुरघास, हायड्रोपोनिक, मशरूम, गांडूळखत प्रकल्पांना प्रोत्साहन.
- अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती व्यवस्थापन.
- कृषीविषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन.
- शेतकरी ते थेट ग्राहक शेतमाल विक्री व्यवस्थापन.
- वनपरिक्षेत्रात फॉडर बँक तयार करणे.
- शीतगृह प्रकल्प व प्रक्रिया उद्योग उभे करणे.
- सर्वसामान्य शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविणे.
- शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावरून प्रत्यक्ष मार्गदर्शन.
- मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन, पशुपालन या छोट्या उद्योगांना मार्गदर्शन व प्रोत्साहन.
- शेती निगडित सर्व घटकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करणे.