एडवेंचर क्लब
जयहिंद एडवेंचर क्लब
राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, सार्वजनिक शिस्त, राष्ट्रीय एकात्मता, प्रामाणिकपणा, धाडस, शौर्य, निर्णय क्षमता यांसारखे गुण असलेली व्यक्ती नागरिक या नात्याने समाजाला ताकद देते व सुदृढ बनविते. अशी व्यक्तिमत्वे घडविण्यासाठी बालपणापासून प्रयत्न व्हायला हवेत. या जाणिवेतून जयहिंदने आठ ते चौदा वयोगटातील मुलां-मुलींसाठी साहस, प्रामाणिकपणा, उच्च नैतिक मूल्ये, सेवाभाव, शिस्त, परोपकार नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या, सर्वधर्मसमभाव, जाती धर्म-निरपेक्षता आदी गुणांची रुजवण करणारा कार्यक्रम राबविणे. साहस शिबिरे, गडकिल्यानां भेटी, आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, स्वरक्षणाचे प्रशिक्षण असा अभ्यासक्रम तयार करणे व भावी आदर्श नागरिक घडविणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. मोठे झाल्यानंतर ही मुले-मुली वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम नेतृत्व देतील व देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपले योगदान देतील.