Democratic Awakening, Youth for Democracy and Healthy Society

महिला सशक्तीकरण

जयहिंद महिला मंच

महिला या समाजात पुरुषांइतकाच महत्त्वाचा घटक असतो. प्रगत राष्ट्रांमध्ये समाजात महिलांना समान संधी व दर्जा दिला जातो. असे देश सर्वार्थाने प्रगत असतात. निसर्गाने महिलांना काही विशेष गुण दिलेले आहेत. उदा. सहनशीलता, चिवटपणा, ममता, करुणा, उत्तम व्यवस्थापन कौशल्ये इत्यादी यामुळे महिला समाजाचे उत्तम नेतृत्व करू शकतात. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी आदींनी ते सिद्ध केलेले आहे.
जयहिंद लोकचळवळीने महिलांना संघटित करून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास त्यांचे कौशल्य व गुणांना प्रोत्साहन देणे हे आपले महत्त्वाचे उद्दिष्ट मानले आहे. समाजातील समविचारी महिला एकत्र येऊन स्वतःचा विकास करण्यासाठी महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम जयहिंद महिला मंचने केले आहे. जयहिंद महिलामंचच्या वतीने वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये....
जयहिंद लोकचलवळीच्या प्रत्येक उपक्रमात किमान 50 % महिलांचा सहभाग असलाच पाहिजे असा आग्रह असतो. महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व साक्षर झाल्या पाहिजे यासाठी महिला बचतगट व स्वयंरोजगाराचे उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात. महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. किचन गार्डनद्वारे कचरा व्यवस्थापन करून परसबागेत भाज्यांचे उत्पादन घेणे संदर्भात मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागात एकात्मिक कृषी प्रकल्पाअंतर्गत जोडधंद्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. सांस्कृतिक उपक्रमांद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरे आयोजित केली जातात, तसेच सामाजिक उपक्रम म्हणून दिवाळीत सैनिकांना मिठाई वाटप व रक्षाबंधनाला राख्या पाठविल्या जातात. अशा विविध उपक्रमांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविणे, तसेच दैववाद व अनिष्ट रूढी-परंपरा याविरुद्ध जण - जागृती करण्याचे काम जयहिंद महिलामंचच्या वतीने केले जाते.

स्त्री ही माणसाची साथीदार आहे, समान मानसिक क्षमतेची भेट आहे - महात्मा गांधी