प्रशिक्षण
जयहिंद प्रशिक्षण
प्रशिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी कोणतेही काम अधिक सफाईदार करण्यास मदत करते. अशा कामातून ते करणाराला एक वेगळेच समाधान मिळते. जयहिंद लोकचळवळ समाजातील विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करते. हे प्रशिक्षण संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे दिले जाते. प्रशिक्षण म्हणजे एखादी गोष्ट अधिक कौशल्याने शिकण्याची प्रक्रिया. प्रशिक्षणामुळे त्या कामासाठी लागणारा पैसा, श्रम आणि वेळ कमी होण्यास मदत होते. जयहिंद लोकचळवळीद्वारे खालील प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते: शेतकऱ्यांसाठी शेतमालाची थेट विक्री, एकात्मिक शेती ,कमी पाण्याची शेती याबाबत प्रशिक्षण. तरुणांसाठी पोलिस भरती चाचणी प्रशिक्षण. महिला आणि तरूणांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण. सामाजिक, आर्थिक आणि लोकशाही विकासाशी संबंधित विविध विषय.